बॅगवरील मिल्खा सिंग यांचा फोटो हटवावा, शीख समुदायाची निगडी पोलीस
ठाण्यात तक्रार दाखल
पिंपरी : डुंजो या ऑनलाईन शॉपिंग ऍपने शॉपिंग बॅगवर केलेल्या डिझाईनमधून प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचा अपमान केला आहे. मिल्खा सिंग यांचा अपमान म्हणजे संपूर्ण शीख समुदायाचा अपमान आहे. त्यामुळे या ऍपने या बॅगवरील मिल्खा सिंग यांचा फोटो हटवावा, अशी मागणी शीख समुदायाने पोलिसांकडे केली आहे.
डुंजो या ऑनलाइन शॉपिंग ऍपने देशभरातील आपल्या ग्राहकांना देण्यासाठीच्या बॅगवर मिल्खा सिंग यांचा फोटो डिझाईन स्वरूपात वापरला असून, यामध्ये शीख धर्मीयांचा स्वाभिमान असलेल्या पगडीचा अपमान केला आहे. त्यामुळे या ऍपने आपल्या बॅगवरील मिल्खा सिंगचा वापरलेला फोटो त्वरित हटवावा; अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा शेख समुदायाच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत मनजीत सिंह यांनी सांगितले, की आम्हाला या ॲप संबंधित काही देणे घेणे नाही. फक्त बॅग वरील फोटोबाबत आमची तक्रार आहे. मिल्खा सिंग हे संपूर्ण देशवासियांचा अभिमान आहेत. एखाद्या कंपनीने त्यांचा केलेला अपमान सहन करून घेतला जाणार नाही.
कमलजीत सिंह यांनी सांगितले, की केवळ या ॲपची प्रसिद्धीसाठीची ही स्टंटबाजी आहे का, असा सवाल या निमित्ताने निर्माण होतो. यासंदर्भात सिख समुदायाने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन निगडी पोलिसांनी दिले आहे.
यावेळी मनजीत सिंह, कमलजीत सिंह, गुरुबक्ष सिंह, जसविंदर सिंह, आजाद सिंह, रमनदीप सिंह, भगवंत सिंह, जतींदर सिंह आदी उपस्थित होते.
0 Comments