दिव्यांग संस्थाना पाच लाखांच्या साहित्याचे केले वाटप

'हाक दिव्यांगांची... साथ लायन्सची' उपक्रमातून केली मदत


पुणे : 'हाक दिव्यांगांची... साथ लायन्सची' उपक्रमातून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांगांना पाच लाखांचे साहित्य वाटप करण्यात आले. १३ दिव्यांग संस्थांतील १२५ हुन अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला असून, एकूण १३ लायन्स क्लबने या उपक्रमात सहभाग घेतला.


शाळेसाठी मोठी कपाटे, टेबल व खुर्च्या, मोठ्या सतरंज्या, लॅपटॉप, प्रिंटर, साऊंड सिस्टीम, गणवेश, पंखे, वसतीगृहासाठी गाद्या, उशा, बेडशीट, ब्लँकेट, स्वेटर्स, कॉट, व्हील चेअर, यासह शैक्षणिक व क्रीडा साहित्य, क्रिकेट कीट, ब्लॅक बोर्ड आदी साहित्य या संस्थांकडे सुपूर्द करण्यात आले. 

  

लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावदे, उपप्रांतपाल परमानंद शर्मा व सुनील चेकर, माजी प्रांतपाल रमेश  शहा, शरदचंद्र पाटणकर, दिपक शहा, द्वारका जालान, हेमंत नाईक यांच्यासह प्रांतातील १३ क्लबचे अध्यक्ष व पदाधिकारी, प्रमुख संयोजक सीमा दाबके यांच्या वतीने पाच लाख रुपयांच्या अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पुणे जिल्ह्यातील १३ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा व कार्यशाळेतील १२५ विद्यार्थी, शिक्षक व लायन्स क्लबचे मान्यवर उपस्थित होते.


राजेश कोठावदे यांनी सर्वांचे कौतुक करत असे उपक्रम समाजाच्या हिताचे असून, प्रांताकडूनही आवश्यक मदतीचे आश्वासन दिले. उपक्रमाचे संकल्पक रमेश शहा म्हणाले, या उपक्रमाला सर्व लायन्स क्लबने उचलून धरत भरघोस मदत केली.


भविष्यातही या सर्व संस्थांना सातत्याने मदत करण्याचा निश्चय सहकाऱ्यांनी केल्याचा अभिमान वाटतो. दीपक शहा यांनी या उपक्रमाला कायमस्वरूपी सहकार्य करण्याचे नमूद करत या उपक्रमांचे रूपांतर फाउंडेशनमध्ये करावे, असे सांगितले.


गेली पस्तीस वर्षे दिव्यांग संस्थांसोबत कार्य करणाऱ्या सीमा दाबके म्हणाल्या, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या जवळपास ७२ संस्था आहेत. या संस्थांच्या मदतीसाठी लायन्स क्लबने एकत्र येत येऊन 'हाक दिव्यांगांची..साथ लायन्सची' हा उपक्रम सुरु केला आहे. शाम खंडेलवाल यांनी स्वागत, सीमा दाबके यांनी प्रास्ताविक, सुजाता शहा यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा दोषी यांनी आभार मानले.


दानशूर क्लब व व्यक्ती

लायन्स क्लब पुणे पर्ल, लायन्स क्लब पूना सारसबाग, लायन्स क्लब पूना गणेशखिंड, लायन्स क्लब ऑफ तळेगाव, लायन्स क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम, लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री, लायन्स क्लब ऑफ ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी, लायन्स क्लब ऑफ पुणे स्पेक्ट्रम, लायन्स क्लब ऑफ पुणे सीनियर्स, लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रल, लायन्स क्लब ऑफ मुकुंदनगर, लायन्स क्लब ऑफ मास्टर माईंड, लायन्स क्लब ऑफ पुणे विधीज्ञ, परमानंद शर्मा, राजेश व मिताली पिल्ले, मंजुषा गोखले.


लाभार्थी दिव्यांग संस्था

स्नेह क्षितिज (शुक्रवार पेठ), ब्रम्हादत्त (निगडी), शुभदा कार्यशाळा (हडपसर), साई सेवा निवासी मतिमंद विद्यालय (शिवणे), सेवासदन दिलासा (लक्ष्मी रोड), प्रकाश ज्योत (हडपसर), उमेद फाऊंडेशन  (परमहंस नगर), ज्ञान गंगोत्री (आंबेगाव  बुद्रुक), ओम साई ओम (बावधन), छत्रपती प्रतिष्ठानचे महावीर निवासी विद्यालय (धायरी), गुरुकृपा (कर्वेनगर), कॉक लिया (गोसावी वस्ती), फनक्राफ्ट ट्रेनिंग सेंटर  (सहकारनगर).

Post a Comment

0 Comments