ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करा; अन्यथा कठोर कारवाई केली जाईल

विदर्भ-मराठवाड्याच्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांचा इशारा

Provide uninterrupted power supply to customers; Otherwise strict action will be taken

नागपूर - वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करा. वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे. यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा. तसेच ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आढावा बैठकीत दिले.

ऊर्जामंत्री राऊत यांनी आज व्हिडीओ कॉन्फसिंगद्वारे महावितरणच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीत बोलताना ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले की, ज्या भागात वसुलीचे प्रमाण कमी आहे, तेथील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. 

वीज ग्राहकांनाचा सुरळीत वीजपुरवठा मिळत नाही, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सक्रियपणे कामे करावी. ज्या एजन्सीकडे ही कामे दिली आहेत, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कामांची गुणवत्ता तपासा आणि कामे संथपणे करीत असतील त्या एजन्सीला ब्लॅकलिस्ट करा.

राज्यातील ज्या जिल्ह्याचे तापमान  सरासरी ४५ अंश से.पेक्षा अधिक आहे, अशा जिल्ह्यातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यासाठी विशेष योजना आखण्याचे आदेशही ऊर्जामंत्र्यांनी दिले. 

यावेळी महावितरणच्या विविध योजनांच्या प्रगतीचा, तसेच महावितरणमधील कर्मचारी संख्या, रिक्त पदे यांचाही आढावा ऊर्जामंत्र्यांनी घेतला. याशिवाय मागासवर्गीयांना पदोन्नती देण्याबाबत प्राधान्याने कारवाई करावी, असेही आदेशही त्यांनी दिलेत.

महावितरणची गंभीर आर्थिकस्थिती लक्षात घेऊन मनुष्यबळाचा आढावा घेण्यात यावा, असे सांगून तिन्ही कंपनीत ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची समिक्षा करून त्या तातडीने रद्द करण्याचे आदेशही ऊर्जामंत्र्यांनी दिलेत. 

या आढावा बैठकीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक सुनील चव्हाण, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) पी.के गंजू, प्रभारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, हाय पॉवर कमिटीचे अनिल खापर्डे, रमाकांत मेश्राम, अनिल नगरारे तसेच विविध परिमंडलाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता उपस्थित होते.

Tags - Provide uninterrupted power supply to customers; Otherwise strict action will be taken

Post a Comment

0 Comments