फ्रेंचायझीच्या माध्यमातून सेवा विस्तारण्याची कंपनीची योजना
मुंबई - भारतातील सर्वात मोठी आणि अग्रगण्य ऑटोमोबाइल ट्रान्झॅक्शनल मार्केटप्लेस ड्रूमने ऑटोमोबाइल आणि रिअल इस्टेटसाठी तंत्रज्ञानचलित अँटीमायक्रोबिअल कोटींग देणारी जर्म शिल्ड दिल्ली-एनसीआरमधील सफल लॉन्चनंतर आता संपूर्ण भारतात आकर्षक फ्रेंचायझीच्या रुपात देऊ केली आहे.
वैयक्तिक पाततळीवर, लहान किंवा मोठ्या व्यावसायिकांपासून ते ऑटो डिलर्स, ऑटो रिपेअर शॉप्स आणि फॅसिलिटी मॅनेजनमेंट कंपन्यांपर्यंत कुणीही जर्म शिल्ड फ्रँचायझी घेऊन त्यांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व्हिसमध्ये या सेवेची जोड देऊ शकतो.
२०२० या वर्षात २०० फ्रँचायझी देण्याची ड्रूमची योजना आहे. प्रामुख्याने भारतातील टॉप २० शहरांमध्ये त्या असण्यावर कंपनीचा भर आहे. फ्रेंचायझी मॉडेलमधील सर्व ऑपरेशन्स तंत्रज्ञानचलित असतील. ड्रूमचा इन हाऊस मोबाईल, प्रभावी डिलिव्हरीसाठी एआय आणि आयओटी बेस्ड सर्व्हिस, फील्ड ओपनिंग व योग्य रितीने प्रक्रियेसाठी मॅपिंग टेक्नोलॉजी, विश्लेषकांमार्फत योग्य निर्णय व कृती, ट्रॅकिंग तसेच चेक्स-बॅलेन्स या ड्रूमच्या सेवांचा याद्वारे लाभ घेता येईल.
ही नवी ऑफर स्वीकारण्यासाठी फ्रँचायझींना मदतही केली जाईल. यासाठी ड्रूमतर्फे २१ व्या शतकातील तंत्रज्ञान स्टॅक, स्टोअर ब्रँडिंग, कच्चा माल, उपकरणे, प्रशिक्षण, सेट अप, मार्केटिंग मटेरिअल, कोलॅटरल, ऑनगोइंग सपोर्ट आणि सर्व मासिक साहित्याचा पुरवठा यासह ड्रूमतर्फे संपूर्ण आणि सर्वसमावेशक प्रशिक्षण व आधार दिला जाईल. ग्राहक आणि भागधारकांसमोर जर्म शिल्ड सर्व्हिसचे सादरीकरण करण्यासाठी प्रँचायझींना स्टँडर्ड इको निंजा ट्रेनिंगदेखील दिले जाणार आहे.
ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ संदीप अग्रवाल यांनी सांगितले की, “जर्म शील्ड सेवेचा विस्तार करणे तसेच व्यवसाय मालक आणि उद्योजकांसाठी आकर्षक व नूतनाविष्कार संपूर्ण भारतभरात पोहोचवण्यात आम्हाला आनंद होत आहे.
ड्रूमने मागील सहा वर्षांमध्ये तंत्रज्ञानाचा एक मोठा पूल बांधण्यावर खर्च केला असून याद्वारे ऑटोमोबाइलच्याही पुढे जाऊन रिअल इस्टेटच्या क्षेत्रातही याचा वापर केला जात आहे. आम्ही पुढील काळात आमचे पार्टनर्स आणि स्टेकहोल्डर्सना विक्रीनंतरच्या सेवा प्रदान करत राहू.”
0 Comments