'कन्टेनमेंट झोन'मधील शिवाजीनगर येथील झोपडपट्टीत धान्याचे वाटप

क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने पुढाकार, महापालिकेचेही सहकार्य

 Distribution of foodgrains in slums at Shivajinagar in 'Containment Zone'
महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसादाचे पत्र देताना क्रेडाई पुणे मेट्रोचे पदाधिकारी

पुणे - 'कोविड-१९'च्या प्रादुर्भावामुळे 'लॉकडाऊन'मध्ये अडकलेल्या गरजू-गरिबांचे होणारे हाल ओळखून 'क्रेडाई पुणे मेट्रो'ने पुढाकार घेत 'कन्टेनमेंट झोन'मधील शिवाजीनगर येथील झोपडपट्टीतील गरजूंना मदतीचा हात दिला आहे.

'क्रेडाई पुणे मेट्रो'ने अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल व नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 'क्रेडाई पुणे मेट्रो' चे अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला आहे, 'कन्टेनमेंट झोनमधील शिवाजीनगर येथील झोपडपट्टीतील गरजूंना धान्य वाटप करण्यात येत आहे. यात तीन हजार कुटुंबांना धान्य पुरविण्यात येत आहे.

साधारण दीड महिन्यापासून सुरु असलेल्या 'लॉकडाऊन'मुळे 'कन्टेनमेंट झोनमधील अनेक रोजंदारीवर कमाविणाऱ्या गरिबांच्या दोन वेळच्या जेवणाचे प्रश्न निर्माण झाले आहे

शिवाजीनगर येथील अतिसंक्रमित भागामध्ये झोपडपट्टी मोठ्याप्रमाणात आहे. अशावेळी महापालिकेच्या सहयोगाने राबविला जाणारा हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. ज्यामुळे या गरिबांना घरात राहणे शक्य होऊन घरपोच अन्न मिळत आहे.

हे धान्य वाटपाचे हे कार्य साधारणपणे बुधवारपर्यंत पूर्ण होणार असल्याचे 'क्रेडाई पुणे मेट्रो'चे प्रतिनिधी तेजराज पाटील यांनी कळविले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत एक विश्वास पत्र महापालिकेला देण्यात आले. यावेळी अखिल अग्रवाल, रुबल अग्रवाल, तेजराज पाटील, पुनीत ओस्तवाल, आय. पी. इनामदार उपस्थित होते.

कोरोना संक्रमणातील या बिकट काळात 'क्रेडाई पुणे मेट्रो'च्या वतीने अनेक मदत कार्य राबविले जात असून त्यातीलच हा एक भाग आहे. यात गव्हाचे पीठ, तांदूळ, तुरडाळ, तेल, मीठ, लाल तिखट, पोहे, हळद आदींचा समावेश आहे.

या धान्य वाटपास सुरुवात झाली असून रोज सुमारे ५०० ते १००० धान्य पाकिटे महापालिकेच्या मदतीने पोहचविली जाणार आहेत. आजवर सुमारे ६०० पाकिटे गरजूंपर्यंत पोहचली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Tags - Distribution of foodgrains in slums at Shivajinagar in 'Containment Zone'

Post a Comment

0 Comments