मुंबई, १४ मे २०२० : कच्च्या तेलाच्या किंमती बुधवारी १.९० टक्क्यांनी घसरून २५.३ डॉलर प्रति बॅरलवर थांबल्या. अमेरिकी क्रूड इन्व्हेंटरी लेव्हलमध्ये ४.१ दशलक्ष बॅरलने वाढ होण्याची अपेक्षा असताना ४,७५००० बॅरलने घट झाली. या महिन्याच्या सुरुवातीला घटती मागणी आणि अति पुरवठा या समस्येमुळे महत्त्वाच्या उत्पादक देशांनी तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केल्याने कच्च्या तेलाच्या किंमतींना आधार मिळाला होता.
सौदी अरब आणि ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंपनीजने पुढील काही महिन्यांकरिता उत्पादन कपातीचे उपाय योजले आहेत. तथापि, कोरोना व्हायरस हिवाळ्याच्या महिन्यात परतण्याच्या चिंतेमुळे तसेच भरपूर नफा देणाऱ्या हवाई उद्योगांवरील निर्बंधांमुळे कच्च्या तेलाच्या नफ्यावर मर्यादा आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
अमेरिकी फेडरल रिझर्व्हने अपेक्षेपेक्षा जास्त लवकर सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्या प्रोत्साहनपर प्लानची घोषणा केल्यानंतर स्पॉट गोल्डच्या किंमती ०.७७ टक्क्यांनी वाढून १७१५.३ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या.
पुढील काही महिने व्याजदर कमी राहणार असल्याने पिवळया धातूच्या किंमतींना आधार मिळण्याची शक्यता आहे. महामारीची दुसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवलेला असताना अनेक देशांनी सर्वसमावेशक आर्थिक पॅकेजेस जाहीर केल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
स्पॉट सिल्व्हरच्या किंमती १.४९ टक्क्यांची बढत घेत १५.६ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. तर एमसीएक्सच्या किंमती ०.२१ टक्क्यांनी घसरून ४२,९६५ रुपये प्रति किलोवर थांबल्या.
0 Comments