कोविड-१९ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी विशेष उपक्रम
कोविड-१९ मुळे सध्या उद्भवलेले अभूतपूर्व संकट आणि त्यामुळे देशभरात वाढवण्यात आलेला लॉकडाउन कालावधी याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना सोसाव्या लागत असलेल्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांची मदत करण्याच्या दृष्टीने सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचे टाटा टीने घोषित केले आहे.
या आपत्तीच्या काळात सर्वाधिक धोका ज्यांना संभवतो अशा ज्येष्ठ नागरिकांची मदत करण्यासाठी टाटा टीने 'इस बार #बड़ोंकेलिए #जागोरे' असे आवाहन केले आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वयोमानामुळे कमी झालेली असल्याकारणाने त्यांना नॉवेल करोना विषाणू संसर्गाचा धोका सर्वाधिक संभवतो. आपल्या माननीय पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये उल्लेख केलेल्या ७ महत्त्वपूर्ण मुद्द्यांमध्ये देखील 'ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी' असे आवर्जून सांगितले होते.
'इस बार #बड़ों के लिए # जागोरे' या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्सचे भारत आणि मध्य पूर्व क्षेत्राचे प्रेसिडेंट - बेवरेजेस श्री. सुशांत दास यांनी सांगितले, "आमच्या जागो रे अभियानाने नेहमीच त्या-त्या वेळच्या सामाजिक मुद्द्यांना अनुसरून जनजागृती घडवून आणून समाजात खऱ्या अर्थाने परिवर्तन व्हावे यासाठी कृती करावी म्हणून लोकांना प्रोत्साहित केले आहे.
आम्ही नेहमीच या अभियानाचा वापर लोकांच्या जीवनात वास्तविक परिवर्तन घडवून आणण्यासाठी करत आलो आहोत आणि यावेळी देखील आमचा तोच प्रयत्न आहे. सध्याच्या परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांची मदत करणे गरजेचे आहे ही जागरूकता लोकांच्या मनात निर्माण करून त्यासाठी काय करता येईल याच्या टिप्स आम्ही 'जागो रे' उपक्रमातून देणार आहोत, यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहभागी करवून घेणार आहोत आणि लोकांसोबत संपर्क साधता यावा यासाठी एक मंच उपलब्ध करवून देणार आहोत. या मंचावर आमचे स्वयंसेवक त्यांचे अनुभव शेअर करतील जेणेकरून इतरांना देखील सक्रिय होण्याची प्रेरणा मिळेल."
टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्सचे व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंग, बेवरेजेस - भारत श्री. पुनीत दास यांनी सांगितले, "सध्याच्या काळात ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात गोंधळ आणि असहायतेची स्थिती निर्माण होऊ शकते.
अशावेळी त्यांच्या वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक गरजा समजून घेणे आणि त्या पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. त्यांना काही हवे आहे का याची चौकशी करणे आणि त्यांना आवश्यक मदत पुरवणे यासारख्या छोट्या कृतींमधून देखील खूप मोठा बदल घडून येऊ शकतो.
अर्थात हे सर्व करताना कोविड-१९ संदर्भात स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक नियम व सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. आजवर ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आणि आपले संरक्षण केले त्या ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ आहे.
त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही उचललेले प्रत्येक छोटे पाऊल देखील खूप मोठे परिवर्तन घडवून आणेल. म्हणूनच आम्ही तुम्हां सर्वांना आवाहन करतो की या चळवळीत सहभागी व्हा आणि 'इस बार #बड़ोंकेलिए #जागोरे' सोबत परिवर्तनाचे दूत बना."
ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था, या विषयातील तज्ञ यांनी देखील या उपक्रमाला समर्थन दर्शवले आहे.
वृद्धांना मदत कशी करता येईल याबाबत मार्गदर्शनपर माहिती, स्वयंसेवी संस्थांची माहिती मिळवण्यासाठी तसेच ज्येष्ठांना मदत करण्यासाठी तुम्ही तयार असल्याचा संकल्प नोंदवण्यासाठी देखील या वेबसाईटचा वापर करता येईल.
- टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड
टाटा समूहाची खाद्य आणि पेय उत्पादने एकाच छत्राखाली आणणारी टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ही ग्राहकोपयोगी उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून वाटचाल करत असलेली कंपनी आहे. जानेवारी २०२० मध्ये लवादाने मंजुरी दिलेल्या स्कीम ऑफ अरेंजमेंटनुसार टाटा केमिकल्स लिमिटेडच्या ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या व्यवसायाचे टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेडमध्ये डीमर्जर झाल्यानंतर या कंपनीची स्थापना करण्यात आली.ही स्कीम ७ फेब्रुवारी २०२० पासून अंमलात आणण्यात आली आहे. या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये चहा, कॉफी, पाणी, मीठ, कडधान्ये, मसाले आणि रेडी-टू-इट खाद्यपदार्थ आहेत. टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ही जगातील दुसरी सर्वात मोठी ब्रँडेड टी कंपनी असून संपूर्ण जगभरात त्यांच्या बेव्हरेजेस ब्रँड्सच्या ३०० मिलियन पेक्षा जास्त सर्व्हिंग्सचे सेवन केले जाते.
त्यांच्या महत्त्वाच्या बेव्हरेजेस ब्रॅंड्समध्ये टाटा टी, टेटले, एट ओ क्लॉक कॉफी, टाटा कॉफी ग्रँड आणि हिमालयन नॅचरल मिनरल वॉटर यांचा समावेश आहे. त्यांच्या खाद्यपदार्थांच्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा सॉल्ट आणि टाटा संपन्न यांचा समावेश आहे.
भारतात टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स २०० मिलियनपेक्षा जास्त कुटुंबांमध्ये पोहोचली असून त्यामुळे ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये टाटा ब्रँडचा लाभ घेण्याची अतुलनीय क्षमता कंपनीला मिळाली आहे. वार्षिक ~१०,००० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या या कंपनीमध्ये ब्रँडेड बिझनेसमध्ये २२०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
‘जागो रे’ अभियान
‘जागो रे’ हा टाटा टी चा सामाजिक जागरूकता उपक्रम असून त्याची सुरुवात २००८ साली करण्यात आली. सामाजिक मुद्द्यांबाबत जनजागृती घडवून आणणे आणि समाजात वास्तविक बदल घडवून आणण्यासाठी सक्रिय होण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने हे अभियान चालवले जाते.काळाची गरज ओळखून त्यानुसार समाजामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणण्यासाठी टाटा टी ने वेळोवेळी 'जागो रे' उपक्रमाचा वापर केला आहे. मतदान करण्यासाठी लोकांना उद्युक्त करणे, भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती इत्यादी सामाजिक मुद्द्यांवर 'जागो रे' अभियानाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. २०१७ साली 'जागो रे' अभियानाने लोकांना कोणतेही संकट येण्याआधी सक्रिय होऊन संकटाला प्रतिबंध घालण्याचे आवाहन केले होते.
0 Comments