कोरोना'च्या काळात 'फार्मपाल'ने देतेय शेतकऱ्यांना मोठा दिलासा

During the Corona period, 'Farmpal' gives great relief to the farmers
File Photo
पुणे - शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दरी कमी करत बाजारपेठ थेट शेतकऱ्याच्या दारापर्यंत आणण्यासाठी पुण्यातील  करन होन व पुनीत सेठी यांनी 'फार्मपाल' या संस्थेची सुरुवात केली आहे. शेतीचा माल बाजारपेठेपर्यंत नेणे, दलालांमुळे शेतमालाचा कमी होत जाणारा भाव, मालाचे नुकसान या सगळ्यावर तोडगा काढत कार्यरत असणरी ही संस्था 'कोरोना' आजाराच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासादायक ठरत आहे. 

तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करणाऱ्या या संस्थेमुळे शेतकऱ्यांच्या दाराशी बाजारपेठ पोहचली असून 'फार्मपाल'च्या या अत्याधुनिक मॉडेलमुळे शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक पैसे मिळू शकत आहेत.

'कोरोना' विषाणूच्या वेळख्यात संपूर्ण जग अडकलेले असताना शेतकऱ्यांचा माल मंदीच्या गर्दीत न जाता तसेच माल वायाही न जाऊ देता लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची सोय 'फार्मपाल' करत आहे.

यासाठी त्यांनी संस्थेशी संलग्न शेतकऱ्यांपासून केवळ ४-४ किलोमीटर अंतरावर याचे संकल केंद्र उभारले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला माल पोहचविणे सोपे होत असून ताजा माल ग्राहकांपर्यंत पोहचू शकतो. त्याचप्रमाणे हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात २-३ दिवसात जमा होतात.

 मालाला मंडई व दलालांच्या तुलनेत १५ ते ३० टक्के अधिक दराने संस्था भाव देत असल्याने गरीब शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होत असल्याचे सेठी यांनी सांगितले. शिवाय नजीकच्या भविष्यात ही संस्था कोणत्या काळात कोणते पिक घेता येऊ शकते, उत्पादन, उत्पन्न व विक्री कशी वाढवता येईल याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जेणे करून पिक व त्याचा दर्जा विकसित होऊ शकेल.

'फार्मपाल' ही संस्था शेतकरी व ग्राहक यांना तंत्रज्ञानाने थेट जोडण्याचे काम करते. होन व सेठी यांनी संस्थेची स्थापना हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन केली. यातील ४०० शेतकरी सुरुवातीलाच त्यांच्या मदतीने आपला माल विकू लागले.

करन होन यांना माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील २० वर्षाहून अधिक जागतिक स्तराचा अनुभव आहे तर पुनीत सेठी यांना विपणन, विक्री व व्यवसाय वृद्धी याचा ११ वर्षाहून अधिक अनुभव आहे. अशा या दोन अनुभवी व्यक्तींनी आपल्या अनुभवाचा फायदा शेतकऱ्याला व्हावा या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली आहे.
Tags - During the Corona period, 'Farmpal' gives great relief to the farmers

Post a Comment

0 Comments