तब्बल १००० भगवदगीतेच्या पुस्तकांचे करण्यात आले विनामूल्य वाटप
आज जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधत लोकसेवा प्रतिष्ठान व इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन यांच्या वतीने इस्कॉनचे संस्थापक आचार्य ए. सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद यांनी लिहिलेली ‘भगवदगीता - जशी आहे तशी’चे वाटप करण्यात आले. लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे, इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भोसले व डॉ. जनार्दन चितोडे यांचे विशेष सहकार्य यासाठी लाभले.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रात दिलेल्या भगवदगीतेच्या संदेशात बुद्धी आणि भावना याचा मिलाफ पहायला मिळतो. याच्या वाचनाने मानसिक ताणतणाव दूर होईलच याबरोबर मन:शांतीदेखील मिळेल.
भगवदगीता ही आपल्याला ‘वसुधैव कुटुंबकम्’ चा संदेश देणारा ग्रंथ असून याद्वारे आत्मविश्वास, मनोबल वाढण्यास मदत होते. हेच लक्षात घेत आम्ही किमान १००० कुटुंबांना भगवदगीता विनामूल्य वाटपाचा हा कार्यक्रम हाती घेतला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
0 Comments