![]() |
File Phoeo |
पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्सचे मंगेश काटे, लॉईटस दास, शेखर मेहता, सुनील बिडलाम यांच्या पुढाकाराने आणि लायन्स क्लब व रोटरी क्लबच्या मदतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मिलिंद दातार, कीर्ती दातार, लायन्स क्लब, आकुर्डीचे हिरामन गवई, रोटरी क्लब लोकमान्यनगरच्या टीना रात्रा, फ्युजन स्पाईसचे नवीन राय, विराज चव्हाण, न्यू प्रशांत एन्टरप्राईजचे प्रशांत आदी या वेळी उपस्थित होते.
या अंतर्गत शहरातील विविध भागात अनेक गरजू नागरिकांना, कुटुंबांना रोज चहा, नाष्टा, जेवण याची सोय करण्यात येत आहे. नुकतीच पोरवाल रस्ता येथे १५ गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके किराणामाल सामानाचे वाटप करण्यात आले. या बरोबरच शहरातील येरवडा व विमानतळ पोलीस स्टेशन या ठिकाणी सॅनिटायझर व मास्कचे वाटप देखील करण्यात आले आहे.
जागोजागी थांबलेल्या पोलीस कर्मचा-यांना नारळपाणी, मास्क, सॅनिटायझर यांचे देखील वाटप करीत त्यांचे आभार फोरमच्या वतीने मानण्यात येत आहेत.
0 Comments