नशामुक्त भारतासाठी एमआय-टीएडीटी विद्यापीठातर्फे राजगडावर साहसी ट्रेक


पुणे : एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थी व्यवहार आणि कल्याण विभागाने 'नशा मुक्त भारत अभियान' (NMBA) च्या बॅनरखाली बदलाची ज्योत प्रज्वलित करत राजगडावर चित्तथरारक ट्रेकिंग मोहीम राबवली.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या पुढाकारातील नशामुक्ति अभियान ,आझादी का अमृत महोत्सव आणि G20 मधील भारताच्या अध्यक्षपदाच्या मजबूत पार्श्वभूमीवर हा उत्कृष्ट उपक्रम आयोजित करण्यात आला. अंमली पदार्थ व मादक द्रव्यांच्या दुरुपयोगाचे दुष्परिणामांसंदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर हा ट्रेक आखण्यात आला होता.

किल्ल्यावर गेल्यानंतर ऊर्जेने भरलेल्या सर्व स्वयंसेवकांनी `जय भवानी, जय शिवाजी`, `वंदे मातरम` अशा गगनभेदी घोषणा दिल्या. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांमध्ये अनोखे चैतन्य निर्माण झाले. या मोहिमेची संकल्पना प्रा. डॉ. सुराज भोयर यांची होती. ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले, तसेच नशामुक्त अभियानाचे महत्व या नशेच्या विळख्यातून युवकांनी बाहेर पडणे किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. नशेपासून मुक्त युवकांमुळेच भारत हा बलवान देश बनू शकतो. त्यामुळे युवकांनी सर्व प्रकारच्या नशेपासून दूर रहावे, असे आवाहन डाॅ. सुराज भोयर यांनी केले.

या वेळी एचओडी, प्रा. डॉ. राजेश जाधव, प्रा. आशीष उंबरकर, प्रा. गोविंद घुले, रोईंग खेळाचे राष्ट्रीय कीर्तीचे प्रशिक्षक संदीप भापकर आणि प्रा. डॉ. नीलेश कर्डिले या प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. 

खडतर ट्रेकच्या माध्यमातून एकप्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तृत्वान इतिहास उलगडण्याचा प्रयत्न जाला. कुजबुजणाऱ्या पानांमधून, मंद पावसाच्या सरीतून, स्वच्छ निर्मळ हवेतून आणि डोंगराच्या विशाल प्रतिमेतून एक प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी कोरली गेली. या स्वयंसेवकांनी निसर्ग मातेच्या संरक्षकांप्रमाणे परिसर देखील स्वच्छ केला, पावन इतिहासातील प्रतिध्वनींमध्ये जीवनाचा श्वास घेतला. प्रत्येक पावलावर त्यांनी परिवर्तनाची गाणी गायली, त्यांचा एकत्रित आवाज मोहिमेचा सार गडाच्या भिंतींपार पोचला.

गडावर पोहोचल्यानंतर सर्वांनी देवी पद्मावतीच्या मंदिराला भेट देऊन आरती आणि प्रार्थना केली. या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या MIT स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटच्या सदस्यांचे आणि क्रीडा विभागाचे आभार व्यक्त करण्यात आले. 

या अनोख्या उपक्रमामध्ये सामिल झाल्याचा आनंद सर्वच स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून आला.


Post a Comment

0 Comments