पुणे - लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठात नवीन शैक्षणिक सत्राची सुरवात सोमवार 10 जुलै रोजी रक्तदानाने करण्यात आली. या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डाॅ. मंगेश कराड यांच्या प्रेरणेतून तसेच विद्यार्थी व्यवहार व कल्याण समितीचे प्रमुख प्रा. डाॅ. सुराज भोयर व क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद प्राप्त झाला.
विद्यापीठाच्या आयएसबीजे बिल्डिंगमध्ये आयोजित या रक्तदान शिबिराला एनसीसी विंग तसेच क्रीडा विभागाचे सहकार्य लाभले. एनसीसी विंगच्या डायरेक्टर मेजर सुमन कुमारी यांनी या शिबिराचे यशस्वी संचालन केले. सकाळी 10 वाजेपासून सुरू झालेले शिबिर सायंकाळपर्यंत सुरू होते. या शिबिराला विश्वराज हाॅस्पिटलच्या तर्पण ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांचे सुयोग्य सहकार्य लाभले.
प्रा. डाॅ. मंगेश कराड यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, विद्यापीठात प्रत्येक वर्षीच्या शैक्षणिक सत्राची सुरवात ही सामाजिक उपक्रमांनी केली जाते. यंदाची सुरवात रक्तदान करून झाली आहे. रक्तदान हे एक अत्यंत पुण्याचे कार्य आहे. ज्याद्वारे आपण कुणाला तरी जीवदान देऊ शकतो. त्यामुळे आमच्या विद्यापीठात हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे.
या प्रसंगी बोलताना प्रा. डाॅ. सुराज भोयर म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. रक्तदाना करून आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो, तसेच आपलेही आरोग्य चांगले ठेवू शकतो. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे व लोकांचे जीवन वाचवण्यात आपला वाटा उचलावा.
शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना मेजर सुमन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसांचे वाटप करण्यात आले. NCC च्या कॅडेटनी तसेचविद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments