मॅजेण्‍टा मोबिलिटीने पुण्‍यात विस्‍तारीकरणाची केली घोषणा


पुणे : मॅजेण्‍टा मोबिलिटी या इलेक्ट्रिक मोबिलिटी व ईव्‍ही चार्जिंग सोल्‍यूशन्‍सच्‍या आघाडीच्‍या कंपनीला भारतातील सर्वात डायनॅमिक शहरांपैकी एक पुणे शहरात त्‍यांच्‍या विस्‍तारीकरणाची घोषणा केली आहे. 

पुण्‍यामध्‍ये प्रवेशासह मॅजेण्‍टा मोबिलिटीचा इलेक्ट्रिक वेईकल्‍स (ईव्‍ही)च्‍या अवलंबतेला गती देण्‍यासोबत येथे स्थिर परिवहनाच्‍या विकासाला चालना देण्‍याचा मनसुबा आहे. मॅजेण्‍टाचे पुण्‍यातील लाँचिंग महती इंटस्‍ट्रीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक सुजय शाह यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 

इलेक्ट्रिक वेईकल्स, चार्जिंग इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर व सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजीचा समावेश असलेल्‍या एकीकृत ई-मोबिलिटी सोल्‍यूशन्‍सच्‍या सर्वसमावेशक श्रेणीसह सध्‍या कंपनी १००० इलेक्ट्रिक वेईकल्‍सच्‍या ताफ्याचे व्‍यवस्थापन पाहते. या वेईकल्‍स ई-कॉमर्स, किराणा माल डिलिव्‍हरी, एफएमसीजी, फूड व फार्मास्‍युटिकल्‍स अशा विविध विभागांमधील क्‍लायण्‍ट्सना त्‍यांच्‍या लास्‍ट-माइल डिलिव्‍हरींसाठी सेवा देतात. चार्जिंग सुविधा देण्‍यासाठी मॅजेण्‍टा सध्‍या भारतभरातील ८०० हून अधिक चार्जर्ससह जवळपास ३५ चार्जिंग डेपोंना ऑपरेट करते. 

२०२४ पर्यंत रस्‍त्‍यावर १ हजार ते १० हजार वेईकल्‍सपर्यंत रूपांतरित होण्‍याच्‍या आणि आपली उपस्थिती प्रबळ करण्‍याच्‍या महत्त्वाकांक्षी लक्ष्‍यासह कंपनी नवीन शहरांचा शोध घेत आहे आणि आपल्‍या चार्जिंग इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर नेटवर्कमध्‍ये वाढ करत आहे.

गतीशील मानसिकता व प्रबळ पायाभूत सुविधांसह पुणे शहर इलेक्ट्रिक वेईकल्‍सच्‍या अवलंबतेसाठी अनुकूल स्थिती प्रदान करते. पुणे शहराच्‍या रस्‍त्‍यांवर ईव्‍ही सादर करत मॅजेण्‍टा मोबिलिटीचा वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी करण्‍याचा आणि अधिक शाश्‍वत परिवहन इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याचा दृष्टिकोन आहे. 

उद्घाटनाच्‍या वेळी आपले मत व्‍यक्‍त करत मॅजेण्‍टा मोबिलिटीचे संस्‍थापक व व्‍यवस्‍थापकीय संचालक मॅक्‍सन लुईस म्‍हणाले, आम्‍हाला पुण्‍यामध्‍ये आमचे इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्‍यूशन आणण्‍याचा आनंद होत आहे. पुणे शहराने शाश्‍वत उपक्रमांप्रती उल्‍लेखनीय उत्‍साह दाखवला आहे आणि आमचा विश्‍वास आहे की आमचा ईव्‍ही विकास शुद्ध परिवहनाप्रती परिवर्तनाला गती देईल.

आम्‍ही लवकरच इतर शहरांमध्‍ये देखील प्रवेश करणार आहोत. पुण्‍यातील आमच्‍या विस्‍तारीकरणाचे श्रेय विविध क्‍लायण्‍ट्सोबतच्‍या आमच्‍या यशस्‍वी सहयोगाला जाते. आम्‍ही पुण्‍यातील मोठ्या प्रमाणातील लास्‍ट-माइल डिलिव्‍हरी ताफ्याला ईव्‍हींमध्‍ये परावर्तित करू, ई-कॉमर्स उद्योगाला डिकार्बनाइज्‍ड लास्‍ट-माइल लॉजिस्टिक्‍सचा अवलंब करण्‍यास प्रेरित करू.

या सहयोगामधून नाविन्‍यपूर्ण व शाश्‍वत ई-मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स वितरित करत भारतातील लॉजिस्टिक्‍सचे इलेक्ट्रिफिकेशन व डिकार्बनायझिंग करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.

Post a Comment

0 Comments