पुणे : अखिल भारतीय नेत्रतज्ञ संघटनेच्या सायंटिफिक कमिटीवर पुण्यातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांची निवड करण्यात आली आहे.
भारतातील नेत्रतज्ञांसाठी सर्वात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या संघटनेचे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच केरळमधील कोचिन येथे पार पडले. या अधिवेशनात ही निवड घोषित करण्यात आली.
डॉ. वर्धमान कांकरिया हे पुण्यातील एशियन आय हाॅस्पिटलचे संचालक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रतज्ञ आहेत.
देशभरात कार्यरत या संघटनेत २७ हजार नेत्रतज्ञ असून, या कमिटीवर डॉ. कांकरिया यांच्यासह देशभरातून ७ नेत्रतज्ञांची निवड करण्यात आली आहे. या कमिटीवर निवडून येणारे डाॅ. वर्धमान कांकरिया हे सर्वात तरुण नेत्रतज्ञापैकी एक आहेत.
डॉ. वर्धमान कांकरिया हे यापूर्वी महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या शास्त्रीय समितीचे प्रमुख तथा सचिव राहिलेले आहेत. महाराष्ट्रात या संघटनेचे ३ हजाराहून अधिक सदस्य आहेत.
डाॅ. कांकरिया यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर नेत्ररोगांसंबधी गहन संशोधन केलेले आहे, ज्याला जगन्मान्यता प्राप्त झाली आहे. शिवाय चष्माच्या नंबर घालविणाच्या लॅसिक शस्त्रक्रियेत सर्वोत्तम कार्यासाठी त्यांचे नाव लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्येही नोंदवण्यात आलेले आहे. अखिल भारतीय नेत्रतज्ज्ञ संघटनेवर महाराष्ट्रातील डॉ. बावनकुळे, डॉ. हिरुर, डॉ. बन्सल यांची विविध कमिटीवर निवड करण्यात आली
0 Comments